आज शिरूर ताजबंद येथील सकाळपासूनच इंद्रायणी निवासस्थानी सहकारमंत्री बाबासाहेब जी पाटील साहेबांच्या भेटीसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून नागरिक आले होते. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या, त्यांची रखडलेली कामे बाबासाहेब जी पाटील साहेबांनी जाणून घेतली. त्यावर त्यांना उपाय सुचवले आणि प्रशासनाकडून रखडलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे सूचनाही दिल्या.