जालना: भ्रष्टाचार झाकण्यासाठी मध्यरात्री रस्त्याचे काम?;निरखेडा ग्रामस्थांचा संताप;काम न करता लाखो रुपयांची बिले उचलल्याचा आरोप
Jalna, Jalna | Jun 22, 2026 जालना तालुक्यातील निरखेडा ते निरखेडा तांडा या रस्त्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सोमवार दि. 22 जून 2026 रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार रस्त्याचे काम प्रत्यक्षात न करताच सुमारे 7 ते 8 महिन्यांपूर्वी लाखो रुपयांची बिले उचलण्यात आली असून, हा प्रकार उघडकीस येण्याची शक्यता निर्माण होताच कंत्राटदाराने मध्यरात्री गुपचूप रस्त्याचे काम सुरू केल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.निरखेडा ते तांडा रस्त्याची सध्या अत्यंत दयनीय अवस्था आहे.