नागपूर ग्रामीण: रेशीम शेतीचा लखपती पॅटर्न: नागपूरच्या शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातही कमावले लाखो!
विदर्भातील कडक उन्हाळ्यावर मात करत नागपूर जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांनी रेशीम शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवले आहे. पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकऱ्यांनी केवळ एका महिन्यात लाखांची कमाई केली आहे.जिल्हा रेशीम विकास अधिकारी स्वप्नील तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली, नागपूर जिल्हा आता 'रेशीम हब' बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. निसर्गाच्या लहरीपणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती सोडून रेशीम शेतीचा मार्ग निवडावा.