पाचोरा: वडगाव टेक खु. मधील कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेना कार्यालयात आमदारांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला,
सद्यस्थितीत जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल वाजला असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आपले बळ वाढवण्यासाठी विविध पक्षांतून कार्यकर्त्यांचा शिंदे गटात ओघ सुरू असून आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सुरूच आहे. तर पाचोरा तालुक्यातील वडगाव टेक (बुद्रुक) येथील राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला.