उमरखेड उपविभागातील अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यासाठी महसूल प्रशासनाने दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी मोठी आणि प्रभावी कारवाई केली. दुपारी सुमारे ४ वाजता मौजा शिरफुली–डोंगरगाव पानांद रस्त्यावरील गस्तीदरम्यान MH 29 BC 4515 क्रमांकाचे अवैधरित्या रेती वाहतूक करणारे टॅक्टर पथकाने जप्त केले. पुढील दंडात्मक कार्यवाहीसाठी हे वाहन तहसील कार्यालय, महागाव येथे जमा करण्यात आले आहे. ही कारवाई उपविभागीय अधिकारी उमरखेड सखाराम मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.