नागपूर ग्रामीण: 'संघर्ष ते सत्तेचा प्रवास आणि विश्वगुरूचा संकल्प'; भाजपच्या ४४ व्या स्थापना दिनी नितीन गडकरींचे प्रतिपादन
भारतीय जनता पक्षाच्या ४४ व्या स्थापना दिनानिमित्त आज नागपुरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या खास प्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी संवाद साधताना पक्षाच्या गौरवशाली प्रवासावर प्रकाश टाकला आणि भविष्यातील ध्येय अधोरेखित केले.