जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांना भेटून सूर्य लक्ष्मी कॉटन मिल्स नगरधनच्या कामगारांनी शिकाऊ कामगार उमेदवारांच्या संदर्भात काही विषयांवर चर्चा केली. रविवार बावीस फेब्रुवारीला सकाळी अकरा वाजता च्या दरम्यान या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्व शिकाऊ उमेदवार कामगारांना कायद्यातील तरतुदीनुसार लाभ मिळवून देण्याकरता आस्थापनांच्या नियमानुसार तपासणी करून कायदेशीर कारवाई करण्याचे निर्णय संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.