लोणी अरब येथे क्षयरोग तपासणी शिबिर संपन्न
1.9k views | Karanja, Washim | Sep 11, 2025 वाशिम (दि.10 सप्टेंबर) : कारंजा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मनभा अंतर्गत आरोग्य उपकेंद्र लोणी अरब येथे हॅन्डहोल्ड एक्स-रे मशीनद्वारे संशयित क्षयरुग्णांची तपासणी करण्यात आली. या शिबिरात एकूण 154 संशयितांचे एक्स-रे काढण्यात आले व 45 थुंकी नमुने तपासणीसाठी संकलित करण्यात आले. जिल्हा व तालुक्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. क्ष-किरण वैज्ञानिक अधिकारी श्री. वैभव रोडे यांनी तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी सरपंच सौ. शगुप्ता परवीन शराफत अली, आरोग्य निरीक्षक श्री. रामदास गवई, तसेच आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.