जालना: शेतकरी डिझेलसाठी रांगेत, सरकारचे दावे हवेत; ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांचा संतप्त सवाल
“शेतकरी टिकला
Jalna, Jalna | May 23, 2026 जालना | प्रतिनिधी “भारत हा कृषिप्रधान देश म्हणून संपूर्ण जगभरात ओळखला जातो. शेतकरी टिकला तरच देश टिकेल. मात्र आज खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाही, ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे,” असा घणाघाती आरोप ठाकरे गटाच्या महिला जिल्हाध्यक्षा रूपम घुगे यांनी केला आहे. राज्यात अनेक ठिकाणी डिझेल-पेट्रोल टंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकऱ्यांना पेट्रोल पंपांवर तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याचे चित्र आहे. यावर प्रतिक्रिया देताना रूपम घुगे म्हणाल्या की, उ