21 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार अशोक मुंधडा वय 65 वर्ष हे महाराज बागते युनिव्हर्सिटी रोडवरून पायदळ जात असताना एका अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. ज्यात ते गंभीर जखमी झाले असून त्याची चा उपचार लता मंगेशकर हॉस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून सीताबर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.