जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी जनावरांची अवैध आणि क्रूरपणे वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन पिकअप वाहनांमधून क्रूरतेने दाटीवाटीने कत्तलीसाठी तेलंगणा राज्यात घेऊन जात असलेली एकूण १० गोवंशीय जनावरे ताब्यात घेण्यात आली असून, त्यांची सुटका करण्यात आली आहे. आज दि २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता मौजा विठ्ठलवाडा ते भंगाराम तळोथी रोडवरील चेकविठ्ठलवाडा बसस्टॉपजवळ ही कारवाई करण्यात आली.