खामगाव: टॉवर चौक,शहर पोलीस स्टेशनरोड,मेन रोड या ठिकाणी शेतकऱ्यांनी फेकले रस्त्यावर फुले
कवडीमोल भाव असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
दिवाळीच्या सणात घराघरात सजावटीसाठी फुलांची सजावट करण्यात येत असते. यामुळे झेंडूच्या फुलांची मोठी मागणी असते. मात्र यंदा पावसामुळे मोठ्या प्रमाणात फुल शेतीचे नुकसान झाले असून आता या फुलांना बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फिरलं. हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी खामगाव शहरातील टॉवर चौक शहर पोलीस स्टेशन रोड,मेन रोड या ठिकाणी रस्त्यावर फुलं फेकून दिली असून हे फुल उचलण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.दिवाळीच्या सणात प्रत्येक घर सुगंधी फुलांनी सजवण्याची प्रथा आहे.