जालना: मालीपुरा परिसरात भिक्षेकरी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
ओळख अद्याप पटली नाही; कदीम जालना पोलिसांकडून तपास सुरू..
Jalna, Jalna | May 16, 2026 मालीपुरा परिसरात भिक्षेकरी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ ओळख अद्याप पटली नाही; कदीम जालना पोलिसांकडून तपास सुरू.. आज दिनांक 16 शनिवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील जुना जालना भागातील मालीपुरा परिसरात अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटरजवळ एका भिक्षेकरी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास नागरिकांना सदर व्यक्ती संशयास्पद अवस्थेत पडलेली दिसून आली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळविले.