लेवा गुर्जर सेवा प्रतिष्ठान जळगावतर्फे रविवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जळगावातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा भवनात भव्य युवक-युवती परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील तरुण-तरुणींना योग्य जोडीदार निवडण्यासाठी हा मेळावा एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरला. यावेळी प्रमुख राजकीय नेत्यांसह समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.