अकोल्यातील रा. स्व. संघाच्या गांधी रोड येथील कार्यालयावर २०१० मध्ये झालेल्या हल्ला प्रकरणी न्यायालयात साक्ष-पुराव्यांचा वेग वाढला आहे. शुक्रवारी या खटल्यातील महत्वपूर्ण साक्षीदाराची साक्ष नोंदवण्यात आली. या प्रकरणात आमदार साजिद खान पठाण, माजी महापौर मदन भरगड, उदय देशमुख, चंदा ठाकुर, सीमाताई ठाकरे यांच्यासह अनेक आरोपींचा समावेश आहे. १२ नोव्हेंबर २०१० रोजी चालला झाला होता. आता त्याची न्यायालयात साक्ष आणि पुरावे घेणे सुरू आहे.