चंद्रपूर: घुटकाला प्रभागात घरफोडीच्या गुन्ह्याचा उलगडा, दोन आरोपींना अटक ,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शहरातील घुटकाला प्रभागात घरफोडी प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या 6 तासात करीत 2 आरोपींसह 2 लाख 90 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 19 ऑक्टोबर रोजी घुटकाला वार्डातील नेहरू शाळेच्या मागील भागात राहणारे फिर्यादी 27 वर्षीय मंगेश प्रमोद रामटेके हे आपल्या कुटुंबासह बाहेर गेले होते, आज दि 20 ऑक्टोबर ला सकाळी 6 वाजता रामटेके कुटुंब घरी परतले असता अज्ञातांनी घराचे कुलूप तोडत रोख व सोन्याच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला होता.दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली.