तेल्हारा: मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शेतकरी विषयी वक्तव्यावर. रयत शेतकरी संघटनेची तीव्र प्रतिक्रिया..
Telhara, Akola | Nov 9, 2025 राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेले वक्तव्य हे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. अशा प्रकारच्या विधानांनी शेतकऱ्यांचा अपमान झाला आहे. शेतकरी हा कर्जबाजारी. शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात सापडला आहे, कर्जबाजारी झाला आहे.हे मंत्री महोदयांनी लक्षात घ्यावे.विखे पाटलांनी शेतकऱ्यांचा अपमान करून त्यांच्या भावनांशी खेळ केला आहे.