पालघर: तारापूर औद्योगिक क्षेत्रातील साल्को कंपनीत शॉक लागून कामगाराचा मृत्यू
तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सालको एक्स्ट्रक्शन प्राइवेट लिमिटेड या कंपनीत कामगाराला शॉक लागला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तेथे त्याला मृत घोषित केले. प्रशांत संखे असे मृत कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.