चांदूर रेल्वे: वऱ्हा शेत शिवार येथे मोटर सायकल जाळल्याच्या संशयावरून इसमावर कुऱ्हा पोलिसात गुन्हा दाखल
रमेश महादेव पंचबुद्धे यांनी उमेश माळोदे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .रमेश हे मोटरसायकल घेऊन शेतात गेले असता दुपारी पाऊस आल्याने शेताजवळ मोटरसायकल ठेवली व घरी गेले रात्री त्यांचा मुलगा मित्रासोबत शेतात गेले असता उमेश व अज्ञात इसम तेथून पळून गेला सकाळी जाऊन बघितले असता रमेश यांना मोटरसायकल जळालेल्या स्थितीत दिसली व माचिस काडया सुद्धा त्या ठिकाणी होत्या .अशी तक्रार रमेश यांनी कुऱ्हा पोलिसात दिली आहे. तेव्हा पोलिसांनी विविध कलमाने उमेश माळोदे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केली.