उरण: त्या सोळा खलाशांना वाचवणारा ठरला देवदूत
वादळामध्ये अडकल्याने दोन बोटिंवरील सोळा खलाशांना एका तरुणांने वाचवल्याची घटना
Uran, Raigad | Nov 1, 2025 मासेमारीसाठी गेलेल्या बोटी अचानक आलेल्या वादळामध्ये बेपत्ता झाल्य.. यातील दोन बोटिंना जलसामाधी मिळाली आहे. तर बेपत्ता बोटिंपैकी अनेक बोटी किनाऱ्यावर परत आल्या. मात्र यातील दोन बोटी वादळामध्ये अडकून होत्या. यातील १६ खालाशी जीव मुठीत घेऊन आपला जीव वाचण्यासाठी देवाचा धावा करत होते. अशा वेळीस करंजा, नवापाडा येथील अतिश सादानंद कोळी या तरुणाने या खालाशांसाठी आपला जीव धोक्यात टाकून खोल समुद्रात जाऊन दोन मासेमारी बोटिंसह सोळा खलाशांचा जीव वाचवण्याचं साहसी कार्य केलं आहे.