सातारा: वाई तालुक्यातील गंभीर गुन्हे दाखल असलेल्या चौघांना दोन वर्षाकरिता तडीपालाचा आदेश
Satara, Satara | Sep 30, 2025 सातारा जिल्ह्यातील, वाई तालुका, भुईंज परिसरातील शरीराविरुद्धचे सातत्याने गुन्हे करणाऱ्या टोळीतील चार जणांना, सातारा पोलिसांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे, मयूर शिवाजी भोसले वय 20 वर्ष, संदीप सुरेश पवार वय 24 वर्ष, विशाल सुभाष भोसले वय 23 वर्षे, अमर विलास माने वय 19 वर्ष ,यांना खुणाचा प्रयत्न करणे, शिवीगाळ दमदाटी करून दुखापत पोचवणे, चार चाकी मोटर वाहन पेटवून देणे यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने,या चौघांना तडीपार करण्यात आले आहे.