जालना: जालना – सर्व समाजासाठी धावणारे नेतृत्व; अरविंदराव देशमुख यांच्या कार्याची दखल कधी?
Jalna, Jalna | Apr 11, 2026 जालना जिल्ह्यात मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव देशमुख हे केवळ मराठा समाजापुरते मर्यादित न राहता सर्व समाजासाठी कार्य करणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. गोरगरीब, कष्टकरी आणि अडचणीत सापडलेल्या नागरिकांसाठी ते नेहमीच धावून जातात, त्यामुळे विविध समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वास निर्माण झाला आहे. मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने लढा देत असले तरी, इतर समाजातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठीही ते तितक्याच तत्परतेने पुढाकार घेतात. “१८ पगड जातींना सोबत घेऊन