सातारा: साताऱ्यात दुर्गा मूर्तीचे आगमन, दुर्गा महोत्सवाला आजपासून सुरुवात
Satara, Satara | Sep 22, 2025 सातारा शहरात आजपासून दुर्गा महोत्सवाची सुरुवात झाली आहे. दुर्गा देवीच्या मूर्तींचे आगमन उत्साहात होत असून ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत भाविकांनी देवीचे स्वागत केले. शहरातील विविध मंडळांतून देवीच्या आगमन मिरवणुका आज सोमवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून काढण्यात आल्या असून नवरात्र उत्सवाच्या नऊ दिवसांच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला आहे. दरम्यान साताऱ्यातील राजहंस नवरात्र उत्सव मंडळाने दुर्गादेवी आगमना वेळी बगाड यात्रेचा देखावा सादर केला.