हवेली: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी कंबर कसली.. सकाळी ७ वाजताच पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल
Haveli, Pune | Sep 29, 2025 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी कंबर कसली आहे. आज (दि.२९) सकाळी ७ वाजता पिंपरी चिंचवड महापालिकेत ते दाखल झाले. शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक सुरू होती.