खामगाव: शेगाव रोडवर मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीलापोलिसांनी ठोकल्या बेड्या
चोरीचे १६ मोबाईल जप्त शहर पोलिसांची कारवाई
पेट्रोलिंग दरम्यान शहर पोलिसांनी शेगाव रोडवरुन एका झायलो कारमधून मोबाईल चोरट्या तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याजवळून चोरीचे महागडे १६ मोबाईल जप्त केले आहेत. त्या तिघांना पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजे दरम्यान अटक केली असून झायलो कार जप्त करण्यात आली आहे.