10 जानेवारीला रात्री 7 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे कळमना हद्दीतील बेले ट्रेडर्स दुकानाच्या मागील मोकळ्या जागेत अवैध रेती साठा आढळून आला. याबाबतची कोणतीही कागदपत्रे आरोपी राजू यादव व तेज बहादूर यादव यांच्याकडे आढळून आली नाही. याप्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आली असून आरोपींकडून 40 ब्रास रेती किंमत तीन लाख वीस हजार रुपये जप्त करण्यात आली. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.