समुद्रपूर: खेक शिवारात वाघाने पाडला दोन बकऱ्यांचा फडश्या, शेतकऱ्याचे २० हजार रुपयांचे नुकसान
समुद्रपुर तालुक्यातील खेक शिवारात चरायला गेलेल्या बकऱ्यावर वाघाने हल्ला चढवित यातील दोन बकऱ्यांना जागीच ठार केले.प्राप्त माहितीनुसार सुमारास खेक येथील रामभाऊ चौधरी व किसन कामडी यांच्या मालकीच्या बकऱ्या खेक शिवारात चरायला गेल्या होत्या यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक बकऱ्यांवर हल्ला चढवित यातील दोन बकऱ्यांना जागीच ठार केले घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.या वाघाच्या हल्ल्यात दोन्ही शेतकऱ्याचे जवळील २० हजार रुपयांचे नुकसान झाले.