सोनपेठ: बच्चू कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी साजरा केला सातबारा कोरा पोळा : सोनपेठ तहसीलदारांना कर्जमाफीचे निवेदन
बच्चुभाऊ कडू यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणी जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी 22 ऑगस्ट रोजी सकाळी सातबारा कोरा पोळा साजरा केला. परभणी तालुक्यातील मटकऱ्हाळा येथे उध्दव गरुड व जिंतूर तालुक्यातील मालेगाव दुधना येथील रामेश्वर पुरी या शेतकऱ्यांनी आपल्या बैलांच्या पाठीवर सातबारा कोरा हा मेसेज लिहून गावामध्ये मिरवणूक काढत पोळा साजरा केला. तर सोनपेठ येथील शेतकऱ्यांनी सातबारा कोरा असा मेसेज बैलांच्या पाठीवर लिहून वाजत गाजत बैलांना तहसील कार्यालयावर सोबत घेऊन जात सातबारा कोरा करण्याबाबत प्रहार