भंडारा नगरपरिषदेच्या दोन प्रभागांतील दोन नगरसेवक पदांसाठी येत्या २० डिसेंबर रोजी मतदान पार पडणार असून, या प्रचाराच्या रणधुमाळीत आमदार डॉ. परिणय फुके यांनी दिलेला ‘बटोंगे तो फसोंगे’ हा नवा नारा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेच्या धर्तीवर, स्थानिक पातळीवर मतदारांचे विभाजन झाल्यास त्याचे नुकसान सोसावे लागेल, असा गर्भित इशारा फुके यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना दिला. या सभेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली..