बीडच्या विशेष मकोका न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज मंगळवार, दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुनावणी झाली. या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि ॲड. बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते. सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले होते.न्यायालयाने आरोपींवरील आरोप वाचून दाखवले असता, वाल्मिक कराडसह सर्व आरोपींनी आरोप मान्य नसल्याचे सांगितले. सुनावणीनंतर बोलताना ॲड. उज्ज्वल निकम यांनी खंडणीस अडथळा केल्यामुळे संतोष देशमुख यांचा खून झाल्याचे स्पष्ट केले.