*सिकलसेल मुक्त समाजासाठी 'पत्रिका' नाही, तर 'रक्तपत्रिका' जुळवणे गरजेचे - डॉ. अभिजीत गोल्हार* सिकलसेल जनजागृती सप्ताहानिमित्त गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन गोंदिया: "लग्नापूर्वी वधू-वरांनी जन्मपत्रिका जुळवण्यापेक्षा सिकलसेलची 'रक्तपत्रिका' (Blood Report) जुळवणे भविष्यातील पिढीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे," असा मोलाचा संदेश गोंदिया जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी दिला आहे.