पुर्णा: आव्हई येथे भरदिवसा घरफोडी ; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास पूर्णा पोलीसात गुन्हा दाखल
Purna, Parbhani | Oct 18, 2025 पूर्णा तालुक्यातील आव्हई येथील रहिवाशी गोपाळ बुचाले यांचे घर अज्ञात चोरट्याने भरदिवसा फोडत घरातील अलमारी मध्ये ठेवलेले एक लाख रुपये रोख व 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण असा एकूण एक लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 30 च्या दरम्यान घडली. याप्रकरणी गोपाळ बुचाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात पूर्णा पोलीसात गुन्हा दाखल.