जालना: जालना जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलची कमतरता; नागरिकांना काळजी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
Jalna, Jalna | May 21, 2026 जिल्ह्यात काही ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलची कमतरता भासत असल्याने नागरिकांनी इंधनाचा वापर जपून करावा, अनावश्यक प्रवास टाळावा तसेच शक्य असल्यास “वर्क फ्रॉम होम”चा पर्याय स्वीकारावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अशीमा मित्तल यांनी केले आहे. जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा काळाबाजार रोखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत कॅन आणि बॉटलमध्ये इंधन देण्यास बंदी घातली असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. या निर्णयामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत असल्याचे मान्य करत प्रशासन त्यात