वर्धा: सावंगी मेघे पोलिसांकडून कुरझडी येथे अवैध रेती उत्खननावर कारवाई
Wardha, Wardha | Sep 22, 2025 वर्धा जिल्ह्यातील कुरझडी येथील नाल्यात अवैधरीत्या काळी रेती उत्खनन करताना पोलिसांनी कारवाई केली. 22 सप्टेंबर रोजी रात्री दीड वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे, सावंगी मेघे पोलिसांनी छापा टाकून सालोड हिरापूर येथील ट्रॅक्टर चालक याच्या ताब्यातून एक ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत 7 लाख आणि 6 हजार किमतीची एक ब्रास रेती जप्त केली.