वरोरा तालुक्यातील दहेगाव येथे ३७ वर्षीय इसमाने घरीच पंख्याला गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना दि.१९ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. अमोल महाकुलकर असे मृत इसमाचे नाव आहे. घरी कुणी नसतांना त्यांने गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नसून सदर घटनेची नोंद वरोरा पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.