जळगाव: गांधली शिवारात विहिरीत बुडून १८ वर्षीय तरुणीचा करुण अंत; अमळनेर पोलीस ठाण्यात नोंद
अमळनेर तालुक्यातील गांधली शिवारात असलेल्या एका शेतातील विहिरीमध्ये बुडून एका १८ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मयत तरुणीचे नाव जयश्री संजय संदानशिव (वय १८, रा. गांधली, ता. अमळनेर) असे आहे.