राज्य निवडणूक आयोगाने अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने नागरिकांना आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याबाबत माहिती व तक्रार देण्यासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे अशी माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली