सेनगाव: सेनगांव परिसरात सततच्या पावसामुळे चक्क उभ्या सोयाबीनलाच येत आहेत कोंब,खरीप हंगाम धोक्यात
हिंगोली जिल्ह्याच्या सेनगांव परिसरामध्ये सततच्या पावसामुळे चक्क उभ्या सोयाबीनलाच कोंब येत असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सेनगाव तालुक्यामध्ये मागील एका महिन्यापासून सतत पाऊस कोसळत असल्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान होत आहे तसेच अनेक ठिकाणी शेतीला तळ्याचे स्वरूप आले व त्यातच आता उभ्या सोयाबीनला चक्क कोंबेत असल्यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे धोक्यात आला आहे त्यामुळे तात्काळ शासनाने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.