ठाणे: टेंभी नाका येथून शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित
Thane, Thane | Sep 30, 2025 नवरात्री उत्सव आले की शिवसैनिकांना वेध लागते ते दसरा मेळाव्याचे. शिवसेनेत दोन गट झाल्याने यावर्षी देखील एक शिंदे गटाचा तर दुसरा ठाकरे गटाचा असे दोन दसरा मेळावा होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी दुपारी 12 च्या सुमारास शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळाव्याचा टीझर प्रदर्शित टेंभी नाका येथून प्रदर्शित करण्यात आला आहे. यंदाही शिंदेंचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे.