अर्जुनी मोरगाव: जिल्हा परिषद शाळा परसोडी रैय्यत येथे माजी मंत्री तथा आमदार राजकुमार बडोले यांनी दिली भेट
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा परसोडी रय्यत येथे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सदिच्छा भेट दिली. शाळेतील भौतिक समस्या ऐकून घेत, शाळेत एकूण १५४ विद्यार्थ्यांची पटसंख्या बघून समाधान व्यक्त केले.मध्यान्ह भोजनाकरीता विद्यार्थ्यांना बसण्यासाठी एका शेडची गरज आहे. ती पूर्ण करण्याचे आमदार बडोले यांनी यावेळी आश्वासन दिले.