पुणे शहर: कोरेगाव पार्क येथील हॉटेल ‘ब्ल्यू डायमंड’मध्ये हाणामारी, वेटरवर 3 जणांचा हल्ला
Pune City, Pune | Oct 22, 2025 कोरेगाव पार्क येथील प्रसिद्ध असलेल्या ‘हॉटेल ब्ल्यू डायमंड’मध्ये हाणामारीची घटना घडली असून एका वेटरवर तीन जणांनी हल्ला केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांनी पाण्याने भरलेली काचेची बाटली फोडून दहशत निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. किरकोळ कारणावरून ही घटना घडली.