बार्शीटाकळी: बहुचर्चित अक्षय नागलकर हत्याकांड प्रकरणी एक कट्टा व दोन जिवंत कारतूस जप्त, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे माहिती.
हत्येमध्ये आरोपीतांनी वापरलेले देशी बनावटीचे अग्निशस्त्र दोन जिवंत काडतूसांसह जप्त करण्यात आले असून गुन्हयात अद्याप देशी बनावटीचे एकून तिन अग्निशस्त्रे (कट्टे) आणि 10 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक श्री. अर्चित चांडक, अपर पोलीस अधिक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन पाटील करित आहेत.