31 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे वाठोडा हद्दीतील साहिल नगर येथे राहणारे अविनाश डाबरे यांच्या घरी राहुल भिवापूरकर वय 26 वर्ष हे इलेक्ट्रिक फिटिंग चे काम करीत असताना त्यांच्या हाताला करंट लागल्याने ते बेशुद्ध झाले त्यांना उपचाराकरिता मेडिकल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याप्रकरणी प्राप्त वैद्यकीय सूचनेवरून पोलीस स्टेशन वाठोडा येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.