जिल्ह्यात हिंस्त्र व वाघ व बिबट्याच्या धुमाकूळीने नागरिक मेटाकुटीस आले आहेत. शेतकरी, शेतमजूर,पशुपालक वन्य प्राण्यांच्या छायेत असतांना भंडारा तालुक्यातील जवाहरनगर जवळील पेवठा शिवारात पट्टेदार वाघाचे वास्तव्य असून दोन दिवसाअगोदर एका गायीची शिकार केली. वनविभागाने शिकार केलेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला. तेव्हा वाघ शिकार खाण्यास आला असता ट्रॅप कॅमेरात कैद झाला. या परिसरात वाघाचे बस्तान असल्याने वनविभागाने वाघाला जेरबंद करून अन्यत्र सोडण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी शुक्रवार दि6ला केली आहे.