धाराशिव जिल्ह्यातील पाच कलाकेंद्रावर कारवाई करत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.कला केंद्रात कला सादरीकरण करायला स्टेज नव्हते तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केल्याची माहिती पोलिस अधिक्षक रितु खोखर यांनी दि.२१ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता दिली आहे.वाशी येथील तुळजाई कला केंद्र कायमस्वरूपी बंद तर पाच कला केंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.