तालुक्यातील लाठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सोनापूर (देशपांडे) येथे दुपारी एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली. मृतकाचे नाव संतोष दामोदर पोरटे (४०) असे आहे. संतोष हा मूळचा गडचिरोली जिल्ह्यातील घोट (नवेगाव) येथील रहिवासी असून तो गेल्या दहा वर्षांपासून पत्नीसमवेत सासरी मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता.