मुदखेड: रेल्वे स्टेशन येथे रेल्वे ट्रॅकवर ट्रॅक्टर ट्राॅली पलटी, सुदैवाने कुठलीही रेल्वे न आल्याने मोठा अनर्थ टळला
Mudkhed, Nanded | May 29, 2025 मुदखेड जंक्शन रेल्वे स्थानकावर आज सकाळी रेल्वे पटरीवर गिट्टी टाकत असतांना ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याने काही वेळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती तर सुदैवाने ट्रॅकवर कुठलीही रेल्वे आली नसल्याने मोठा अनर्थ आज टळला आहे.मुदखेड रेल्वे स्थानकात दुरूस्तीचे काम सुरू आहे. या कामासाठी ट्रॅक्टर लावण्यात आले होते हाच ट्रॅक्टर आज पलटी खाल्ला होता.आज गुरुवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुदखेड रेल्वे स्थानकातील प्लॅट फॉर्म १ व २ वर ट्रॅक्टरमधून गिट्टी टाकणे चालू होते. गिट्टी टाकत असतांना हि घटना घडली