निफाड: ओझर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, फरार संशयीत अल्पवयीन मुलगा पोलिसांनी घेतला ताब्यात
Niphad, Nashik | Mar 26, 2025 ओझर टाऊनशिप परिसरात एका गावामध्ये अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याची संधी साधून अल्पवयीन मुलाने तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची घटना दि. 25 रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली होती, दि.2 9 आणि 16 मार्च 2025 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान या घटनेत पाच आरोपीवर प्रथमदर्शनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र सखोल चौकशीनंतर या घटनेत पिडीत मुलीवर एकाच अल्पवयीन मुलाने अतिप्रसंग केला असल्याचे निष्पन्न झाले आहे, असे ओझर पोलिसांनी आज दि. 26 रोजी सायंकाळी सहा वाजता सांगितले.