जिल्ह्याच्या रेल्वे प्रश्नांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिल्लीच्या तख्तावर सातत्याने आवाज उठवला आहे. अशा परिस्थितीत, 'रेल्वे सुविधांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करत नाही' असे निराधार आणि राजकीय हेतूने प्रेरित आरोप करणे, हे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. आज दि 6 डिसेंबरला 11 वा.सुरु केलेल्या चंद्रपूर रेल प्रवासी संस्थेच्या उपोषणाला आमचा पूर्ण नैतिक पाठिंबा आहे, मात्र माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्याऐवजी, मी केलेल्या धडाडीच्या कामाचा पुरावा जनतेसमोर आहे.