वडवणी: मयत डॉ.संपदा मुंडे यांच्या आरोपींना फाशीची शिक्षा द्या, तिच्या भावाची माध्यमांसमोर मागणी
Wadwani, Beed | Nov 2, 2025 डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात नव्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणातील तपासावर देखरेख ठेवण्यासाठी एसआयटीवर नियंत्रण ठेवणारी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती गठित करण्यात यावी, अशी मागणी मयत डॉ. संपदा मुंडे यांच्या भावाने केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. संपदाच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी त्यांनी जोरदारपणे केली.